मॉडेलच्या झगमगाटी दुनियेमध्ये अनेक वेळा सौंदर्याला रंगाशी जोडले जाते. मात्र यावर मात करत एका मॉडेलने यशाचे नवे शिखर पादाक्रांत केले आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल मात्र ही मॉडेल एका तासाच्या फोटोशूटसाठी फक्त ९ लाख ६० हजार रुपये घेते. अनोक याई असे या मॉडेलचे नाव असून ती मूळची सुदान या देशाची रहिवासी आहे. १९ वर्षीय अनोक याई हिला मॉडेलिंग साठी अनेक कंपन्यांकडून ऑफर आल्या आहेत. मात्र तिने यापैकी फक्त तीन कंपन्यांसोबत करार केला आहे.अनोक याई अमेरिकेतील वॉशिंग्टन शहरात असणाऱ्या हार्वर्ड विद्यापीठाच्या एका कार्यक्रमाला गेली असताना तेथील एका फोटोग्राफरने तिला कॅमेऱ्यात कैद केले. सोशल मीडियावर या फोटोंनी धमाल उडवून दिली. अनोकच्या फोटोंबाबत लोकांची वाढती क्रेज लक्षात घेता एका मॉडेल एजन्सीने तिच्यासोबत मॉडेलिंगसाठी करार केला. त्यानंतर आणखी तीन कंपन्यांनी तिच्यासोबत मॉडेलिंगसाठी करार केला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews